आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय विरोधकांना चितपट करणा-या पंकजा मुंडे जेव्हा \'ब्लॅक बेल्ट\' मिळवतात....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिपब्लिक ऑफ कोरियातील मुंबई दुतावास कार्यालयाने पंकजा यांचा मानद ‘ब्लॅक बेल्ट’ देऊन त्यांचा गाैरवही केला. - Divya Marathi
रिपब्लिक ऑफ कोरियातील मुंबई दुतावास कार्यालयाने पंकजा यांचा मानद ‘ब्लॅक बेल्ट’ देऊन त्यांचा गाैरवही केला.

मुंबई- राज्यातील भाजपच्या ताकदीच्या नेत्या व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्टचा मानद खिताब मिळवला आहे. त्यांचा मुलगा आर्यमान याला या खेळातील गोल्ड मेडल मिळाले आहे. या स्पर्धेचे आयोजन रिपब्लिक ऑफ दक्षिण कोरियाच्या मुंबई स्थित दूतावासाने केले होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत कोरियातील खेळाडूंनी आपले कर्तृत्व दाखवले. मंगळवारी झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात पंकजा मुंडे प्रमुख पाहुण्या होत्या. भाजपचे बडे नेते राहिलेल्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहेत पंकजा मुंडे. मुलाच्या विजयानंतर काय म्हणाल्या पंकजा....

 

- या इव्हेंटमध्ये देश-विदेशातील 800 तायक्वांदो प्लेयर सामील झाले होते. तायक्वांदो ब्लॅक बेल्टचा मानद किताब मिळाल्यानंतर आणि मुलाच्या विजयानंतर पंकजा म्हणाल्या, " मी इतर पालकांप्रमाणे येथे सामील झाले आहे. मी पण माझा मुलगा जिंकतो की नाही याचा विचार करत होते. मला वाटते तायक्वांदो आपल्या शारीरिक फिटनेससाठी खूप गरजेचे आहे. सचिन तेंडुलकर यांनीही माझ्या मुलाला या खेळात पुढे जाण्यास प्रोत्साहित केले आहे. "
- कुककिवन, विश्व तायक्वांदो मुख्यालयकडून पंकजा यांना ब्लॅक बेल्टची आनरेरी रॅंक (मानद) दिली आहे. 

 

पंकजांना कराटे-तायक्वांदोची आवड-

 

- बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे प्रमुख पाहूण्या हाेत्या. त्यांनी स्पर्धकांचे काैतुक करत कोरियन खेळाडूंसोबत काही डावपेच लढवले. 
- स्पर्धेनंतर पंकजांच्या हस्ते विजेत्या खेडाळूंना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. माय-लेकाचे कौतुक पाहण्यासाठी पंकजांचे पती अमित पालवे, बहिण खासदार प्रीतम मुंडेे यांची उपस्थिती होती.
-भाजपचे ज्येष्ठ नेते गाेपीनाथ मुंडे यांची वारसदार असलेल्या पंकजांनी अाजवर सभांची अनेक मैदाने मारली अाहेत.
- विधिमंडळातही त्या विराेधकांच्या प्रश्नांना चाेख उत्तर देत असतात. मात्र तायक्वांदो स्पर्धेच्या निमित्ताने सरावासाठी कोर्टवर उतरल्यानंतर क्रीडा क्षेत्रातील त्यांची आवड पहिल्यांदाच सर्वांसमोर आली. 
- पंकजा मुंडे यांना कराटे, तायक्वांदोची मूळात खूप आवड आहे. त्यामुळे मुलगा आर्यमानला त्यांनी या खेळात घातले. मुलानेही अाईची ही अावड यशस्वीपणे जपल्याची चर्चा उपस्थितांमध्ये हाेती.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, तायक्वांदो स्पर्धेत सहभागी झालेल्या पंकजा मुंडेंचे काही निवडक फोटोज...

बातम्या आणखी आहेत...