आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा रस्त्याच्या कडेला लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये राम शिंदे रस्त्याच्या कडेला उभे राहून लघुशंका करताना दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राम शिंदे यांनी स्वत:चा बचाव करत सारवासारव केली आहे.

 

सोलापूर-बार्शी मार्गावरील ही घटना असून राम शिंदे हे कारने जात होते. जलयुक्‍त शिवार योजनेसाठी शिंदे मागील एक महिन्यापासून दौर्‍यावर आहेत. कार प्रवासामुळे प्रचंड थकवा आला होता. प्रवासादरम्यान प्रकृती बिघडल्यामुळे रस्त्याच्याकडेला लघु शंका केल्याचे राम शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

भाजपच्या मंत्र्याला हायवेवर एकही शौचालय दिसले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'स्‍वच्‍छ भारत अभियान' अयशस्वी ठरले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...