आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलियासारखे आहे या अब्जाधीशाचे घर, वडील किरायाच्या घरात राहण्यास मजबूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताचे टॉप बिझनेसमनमध्ये गणना होणारी सिंघानिया फॅमिली सध्या चर्चेत आहे. एका वृत्तपत्राने दावा केला आहे की, रेमंड कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया यांना त्यांचा मुलगा गौतमने घरातून बाहेर काढले आहे. गौतम यांनी त्यांचा ड्रायव्हर आणि गाडीही काढून घेतली आहे. विजयपत सिंघानियांना पायी फिरावे लागत असून ते सध्या किरायाच्या घरात राहत असल्याचे कळते. मात्र, गौतम सिंघानिया यांचे घर जेके जाऊस मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाहून उंच आहे. गौतम लक्झरी याट आणि महागड्या कारचे शौकीन आहेत. 
 
37 मजली आहे जेके हाऊस
- गौतम सिंघानिया यांचे जेके हाऊस मुंबईच्या ब्रीचकँडीवर स्थित आहे. तथापि, हा देशातील दुसरा सर्वात मोठा बंगला आहे.
- 2012 मध्ये या घराचे कन्स्ट्रक्शन सुरू झाले. परंतु 2013 मध्ये यावर रोख लावण्यात आली होती.
- जेथे सिंघानिया मॅन्शन बनत आहे, त्याच जागी अगोदर रेमंडचे शोरूम बनत होते.
- हे हाऊस 1 एकराच्या भूखंडावर उभारलेले आहे. या जमिनीवर पूर्वीपासूनच सिंघानिया फॅमिलीचा 1960 मध्ये बनलेला ग्राउंड प्लस टू बंगला आहे.
- नव्या बिल्डिंगमध्ये बेसमेंट प्लस स्टिल्ट्स, पहल्या आणि दुसऱ्या फ्लोरवर दुकान, तिसऱ्या आणि 14व्या फ्लोरदरम्यान पार्किंग आणि दोन रिफ्युज फ्लोर (म्हणजे अशी जागा, ज्यात एखादा आपत्तीत घरातील लोक मदत मिळेपर्यंत थांबू शकतील. 12 मजल्यांपेक्षा मोठ्या इमारतींत अशी जागा असणे अनिवार्य आहे.) आहेत.
- 15व्या ते 18व्या फ्लोरदरम्यान एक म्युझियम आहे. 19व्या फ्लोअरवर सर्व्हिस एरिया आहे, तर 20व्या फ्लोअरपासून ते 36व्या फ्लोअरपर्यंत निवास, रिफ्युज एरिया आणि इतर सुविधांबरोबरच एसी प्लांट रूम आहे.
 
अशी आहे सिंघानिया फॅमिली
- सिंघानिया फॅमिली रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया आहेत. गौतम यांचा जन्म 9 सप्टेंबर 1965 रोजी झाला.
- त्यांच्या वडिलांचे नाव विजयपत सिंघानिया आणि आईचे नाव आशाबाई सिंघानिया आहे.
 
प्रायव्हेट जेट आणि याटचा आहे शौक
- गौतम सिंघानिया देशाच्या त्या निवडक बिझनेसमनपैकी आहेत, ज्यांच्याकडे प्रायव्हेट जेट आणि याट आहे.
- त्यांच्याकडे दोन याट मूनरॅकर (Moonracker) आणि अशिना (Ashena) आहे.  Moonracker मार्केटमध्ये उपलब्ध सर्वात महागडी याट आहे.
- दुसरीकडे, अशिना गुजरातच्या जंगलांतून तब्बल 568 वृक्ष कापून तेथील स्थानिक कारागिरांनी बनवली.
- एवढ्या मोठ्या संख्येने वृक्षतोड झाल्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाईलाही तोंड द्यावे लागले.
- सिंघानिया यांच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये फेरारी 458, लोटस एलिस, होन्डा एस 2000 आणि लॅम्बोर्गिनी अशा कारचा समावेश आहे. 
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, संबंधित PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...