आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लेडीने 8 वर्षे डेटिंगनंतर केले बिझनेमनसोबत लग्न; नाइटक्लबमधून सुरु झाली लव्हस्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील टॉप बिझनेसमन सिंघानिया फॅमिली सध्या चर्चेत आहे. रेमंड कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया यांना मुलगा गौतम सिंघानिया याने घराबाहेर काढले आहे. एका वृत्तपत्राने हा दावा केला आहे. गौतम यांनी वडिलांकडून कार आणि चालकही काढून घेतला आहे. त्यामुळे विजयपत सिंघानियांना पायी फिरावे लागत आहे. ते सध्या भाड्याच्या घरात राहत असल्याचे समजते.

गौतम सिंघानिया यांच्या कॉर्पोरेट लाइफसोबतच त्यांची पर्सनल लाइफही रंजक आहे. त्यांची लव्हस्टोरी एका नाइटक्लबमधून सुरु झाली होती. पत्नी नवाझ यांना ते पहिल्यांदा नाइटक्लबमध्येच भेटले होते. तब्बल 8 वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला होता.

पारसी मुलीसोबत विवाह करणे होते कठीण... .
- गौतम यांची पत्नी नवाझ या पारसी आहेत. पारसी मुलीसोबत लग्न करणे, त्या काळात फारच कठीण होते, असे खुद्द गौतम यांनी सांगितले होते.  
- विजयपत सिंघानिया यांचा गौतम यांच्या प्रेम विवाहला नकार होता.
- विवाहानंतर दोन्ही समाजात सांस्कृतिक अंतर असल्याने गौतम आणि नवाझ यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
 
गौतम यांच्या लाइफस्टाइलशी संबंधित काही फॅक्ट्‍स...
- गौतम यांनी 2005 मध्ये मुंबईतील वांद्रे येथे ‘पॉयझन’ नामक एक नाइटक्लब सुरु केले होते.
- अलीबागमध्ये त्यांचे एक फार्म हाऊसही आहे. दरवर्षी येथे ते मि‍त्रांना न्यू ईअर पार्टी देतात.
- गौतम यांना लहानपणापासून लक्झरी कारचा छंद होता. त्यांच्या 18 व्या वाढदिवशी त्यांना वडिलांनी Premier Padmini 1100 कार गिफ्ट केली होती. 
- बॉलिवुड अॅक्ट्रेस रवीना टंडन आणि गौतम यांच्यात खास मैत्री आहे.
- गौतम सिंघानिया यांची पत्नी नवाझ आर्टिस्ट आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... गौतम आणि नवाज यांचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...