आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली होती मुंबई, रस्त्यावर मृतदेहांचा सडा तर शहर बनले होते स्मशानभूमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 12 मार्च 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज (गुरुवारी) विशेष टाडा कोर्टाने अबु सालेम आणि करिमुल्लाह याला आजन्म कारावास सोबतच प्रत्येकी दोन लाख रुपये दंड, ताहीर मर्चंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा तर रियाज सिद्दीकीला 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोर्टाने 16 जून 2017 रोजी अबू सालेम, मुस्तफा दोसा, त्याच्या भाऊ मोहम्मद दोसा, फिरोज दोसा, रशिद खान, मर्चेंट ताहिर आणि करीमुल्लाह शेख यांना दोषी ठरवले होते. यातील एक आरोपी मुस्तफा दोसा याचा 28 जूनला तुरुंगातच हार्टअटॅकने मृत्यू झाला होता.

या साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली होती. रस्त्यावर मृतदेहांचा सडा पडला होता तर संपूर्ण शहर स्मशानभूमी बनले होते.

मुंबईत कसे झाले साखळी बॉम्बस्फोट...
पहिला स्फोट- दुपारी 1.30 वाजता, मुंबई स्टॉक एक्सचेंज
दुसरा स्फोट- दुरापी 2.15 वाजता, नारसी नाथ स्ट्रीट
तिसरा स्फोट- दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन
चौथा स्फोट- दुपारी 2.33 वाजता, एअर इंडिया बिल्डिंग
पाचवा स्फोट- 2.45 वाजता, सेन्चुरी बाजार
सहावा स्फोट- 2.45 वाजता, माहिम
सातवा स्फोट- 3.05 वाजता, झवेरी बाजार
आठवा स्फोट- 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल
नऊवा स्फोट- 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा
दहावा स्फोट- 3.20 वाजता, जुहू सेंटर हॉटेल
आकरावा स्फोट- 3.30 वाजता, सहार एअरपोर्ट
बारावा स्फोट- 3.40 वाजता एअरपोर्ट सेंटर हॉटेल


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... हादरलेल्या मुंबईचे फोटो..आणि  इतर 6 जणांचा काय होता रोल?
बातम्या आणखी आहेत...