आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena News In Marathi, BJP, Divya Marathi

मनसे म्हणते, भाजपने यावेळी आम्हालाच मदत करून \'पैरा\' फेडावा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत भाजपच्या नेत्यांनी शुक्रवारी विधान परिषद निवडणुकीत मदत करावी, अशी विनंती त्यांना केली. मात्र, ‘या वेळी तुम्हीच आम्हाला मदत करा’, असे सांगत मनसेने भाजपच्या नेत्यांची बोळवण केल्याचे सूत्रांनी सांगितले. वर ‘तुमचा काय निर्णय होतो ते आम्हाला कळवा,’ असेही मनसेने भाजप नेत्यांना सांगितल्याचे कळते.

दुपारी दोनच्या सुमारास विनोद तावडे आणि आमदार आशिष शेलार यांनी राज यांची भेट घेतली. तासभर चाललेल्या या बैठकीत विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या 12 आमदारांची मते भाजपच्या उमेदवाराला द्यावीत, अशी विनंती भाजप नेत्यांनी केली.

मात्र, गेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या आशिष शेलारांसाठी आपली मते दिल्याची आठवण करून देत मनसेने या वेळी आपल्या उमेदवाराला तुमची शिल्लक मते द्या, अशी उलट मागणी भाजपकडे केल्याचे कळते. यावर ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय कळवू, असे आश्वासन विनोद तावडे यांनी राज यांना दिल्याचे कळते.

मनसेला 29 मतांची गरज- मनसेचे सध्या 12 आमदार विधानसभेत असून विधान परिषदेत निवडून येण्यासाठी त्यांना अजून 17 मतांची गरज आहे. भाजपचे विधानसभेत 47 आमदार आहेत. त्यांचा एक उमेदवार विजयी झाल्यानंतरही 18 मते शिल्लक राहतात. अशा वेळी जर भाजपने मदत केली तर मनसेच्या उमेदवाराचा विजय सुकर होऊ शकतो. त्यातच जनसुराज्य आणि शेतकरी कामगार पक्षानेही राज यांची भेट घेत मदतीचा हात पुढे केला आहे.