आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena News In Marathi, Police Recruitment, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मनसे देणार जेवण आणि अल्पोपहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील पोलिस भरती संपेपर्यंत उमेदवारांना मनसेच्या वतीने अल्पोपहार आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. भरतीदरम्यान आयोजनात झालेल्या त्रुटींमुळे पाच उमेदवारांचा मृत्यू झाला होता. पाणी, जेवण किंवा निवा-याची कोणतीही सोय भरतीच्या ठिकाणी नसल्याने हे मृत्यू ओढवल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

सध्या मुंबईत पूर्व महामार्गालगत सुरू असलेल्या पोलिस भरतीतील सदोष आणि ढिसाळ आयोजनाचा फटका उमेदवारांना बसत आहे. त्यातच कडक उन्हात पाच किमीची धावण्याची चाचणी उमेदवारांची कठीण परीक्षा पाहत आहे. परिणामी गेल्या आठवडाभरात मुंबई आणि ठाण्यात पाच उमेदवारांचा मृत्यू झाला होता.
पुढे वाचा....