मुंबई - मराठी अस्मिता हा आपला हुकमी पत्ता मनसेने पुन्हा एकदा बाहेर काढला आहे. त्यासाठी निमित्त ठरले आहे ते गेल्या आठवड्यात मुंबईतल्या दहिसर भागात झालेल्या मारहाणीचे. मांसाहार केला म्हणून गेल्या अाठवड्यात एका मराठी कुटुंबाला शेजारच्या गुजराती कुटुंबातील महिलांनी मारहाण केली होती. नेमका हाच धागा पकडून मनसेने मुंबईच्या राजकीय पटलावर ‘घरवापसी' करण्याची रणनीती आखली आहे. याचाच एक भाग म्हणून चालू आठवड्यात मुंबईतील तमाम गुजराती आणि जैन रहिवासी राहत असलेल्या सोसायट्यांच्या आवारात मांसाहारी पदार्थांचे मोफत वाटप करण्याचा राजकीय ‘बेत’ मनसेने आखला आहे.
दहिसर परिसरातील बोना व्हेंचर या गुजरातीबहुल हाउसिंग सोसायटीमध्ये गोविंद चव्हाण या मराठी नाट्य निर्मात्याच्या कुटुंबीयांना मांसाहारी पदार्थ शिजवल्याच्या कारणास्तव मारहाण करण्यात आली. मारहाण करणा-यामहिला या गुजराती समाजाच्या असल्याने मराठी विरुद्ध गुजराती असा वाद त्यामुळे पेटला होता. या मुद्द्याचे भांडवल करत मग शिवसेना आणि मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सोसायटीसमोर आंदोलनही केले. मात्र गेले अनेक दिवस राज्याच्या राजकीय पटलावर कमबॅक करण्यासाठी इच्छुक असलेल्या मनसेने ही सुवर्णसंधी हेरली असून गुजराती समाजाविरोधात एक अनोखे आंदोलन करण्याची योजना आखली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुढे वाचा, मनपा निवडणुकीची तयारी