आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खात्यांनंतर आता बंगल्यांसाठी स्पर्धा, नव्या मंत्र्यांना हवीत समुद्र किना-यावरील घरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपच्या नेतृत्वात राज्यात स्थापन झालेल्या सरकारमधील मंत्र्यांमध्ये खात्यांसाठीची स्पर्धा संपली असली तरी आता एक नवी स्पर्धा सुरू झाली आहे. ती स्पर्धा म्हणजे बंगल्यांसाठीची स्पर्धा. आपल्या आवडीचे बंगले मिळवण्यासाठी या मंत्र्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. नव्या मंत्र्यांची नजर समुद्र किना-यावर असलेल्या रामटेक, देवगिरी, चित्रकूट आणि पर्णकुटी या या बंगल्यांवर आहे. अद्याप सरकारने मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप केलेले नाही.
सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सामान्य प्रशासन विभागाने न्या मंत्र्यांनी बंगल्यांसाठी केलेले अर्ज मुख्यमंत्र्यांकडे पाठवले आहेत. त्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही मंत्र्यांचा मोह अद्याप सुटलेला दिसत नाही. त्यामुळे अनेक माजी मंत्री बंगला रिकामा करण्यास मागेपुढे पाहत आहेत. काही मंत्र्यांनी बंगले रिकामे करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे.

‘रामटेक’ला मागणीचे कारण
15 वर्ष सत्ता असलेल्या आघाडी सरकारच्या काळात रामटेक बंगला माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे होता. साधारणपणे सरकारमध्ये क्रमांक दोनचा दर्जा असलेल्या मंत्र्याला रामटेक बंगला दिला जातो. रामटेकमध्ये राहणारा मंत्री भविष्यात मुख्यमंत्री बनतो असे म्हटले जाते. पण त्याला काही अपवादही आहेत.

खडसे व पंकजा यांना हवा ‘रामटेक’
बंगल्यामध्ये रामटेक ही मंत्र्यांची पहिली पसंती आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या बंगल्यांवर दावा केला आहे. खडसे 1995 मध्ये शिवसेना-भाजपच्या युती सरकारमध्ये अर्थमंत्री होते. तर पंकजा या प्रथमच मंत्री बनल्या आहेत. ज्येष्ठतेनुसार खडसे यांचा रामटेकवर हक्क असल्याचे म्हटले जात आहे. पण युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री म्हणून हा बंगला देण्यात आला होता. त्यामुळे पंकजा या बंगल्याची मागणी करत आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, मुनगंटिवार यांना हवा देवगिरी...