आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँडरिंग प्रकरणी महाराष्‍ट्र अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनी लॉँडरिंगच्या आरोपांतर्गत अंमलबजावणी महासंचालनालयाने हाती घेतलेल्या कडक कारवार्इंतर्गत 80 पेक्षा जास्त मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे. विशेष म्हणजे मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या राज्यातील यादीमध्ये महाराष्‍ट्र सर्वात वरच्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे.अधिकृत आकडेवारीनुसार कथित संशयित अशा 80 टक्क्यांपेक्षा जास्त मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्या पश्चिम राज्यातआहेत. राजस्थान आणि पंजाबसारख्या अन्य राज्यांमध्ये या प्रकारात मोडणार्‍या मालमत्तांचे प्रमाण कमी आहे. अशा प्रकारच्या एकूण 96 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
मनी लॉँडरिंगचा आरोप असलेल्या अशा प्रकारच्या अन्य राज्यांमधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश केंद्रीय आर्थिक अंमलबजावणी संस्थेने दिले आहेत. मनी लॉँडरिंग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत मालमत्ता जप्त करण्याची परवानगी देण्यात आली आहे.