आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ मोठ्या पहिलवानांना चित करतो गरीब कुटुंबातील हा मराठमोळा \'ARNOLD\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - महाराष्ट्र पोलिसातील जवान किशोर डांगे आपल्या एका फॅनबरोबर.
मुंबई - महाराष्ट्र पोलिस दल देशातील सर्वात मोठ्या पोलिस दलांपैकी एक आहे. गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी म्हणूनही त्यांचे प्रयत्न सुरू असलतात. पण कर्तव्य बजावण्याबरोबरच महाराष्ट्र पोलिस दलातील जवान इतरही अनेक क्षेत्रांमध्ये नाव उंचावत आहेत. त्याबाबत माहिती देण्यासाठी आम्ही 'वीर महाराष्ट्राचे' नावाची मालिका सुरू करत आहोत. त्यात आज महाराष्ट्र पोलिसांत अरनॉल्ड नावाने ओळखल्या जाणार्‍या वीर किशोर डांगे बद्दल सांगणार आहोत.

किशोर महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील जालना जिल्ह्यात कॉन्सटेबल पदावर तैनात आहेत. पोलिसांत नोकरीबरोबरच किशोर डांगे बॉडी बिल्डींगही करतात. त्या जोरावर त्यांनी देश-विदेशातील अनेक स्पर्धांमध्ये पदके पटकावली आहेत. गेल्या वर्षी त्यांनी नॉर्थ आयरलँड येथील बेलफास्टमध्ये झालेल्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले होते.

गरीब कुटुंबामध्ये झाला जन्म
मिस्टर महाराष्ट्र, मिस्टर मराठवाडा असे अनेक किताब किशोर यांनी आपल्या नावावर केले आहेत. त्याशिवाय ते अनेक परदेशी स्पर्धांमध्येही त्यांनी पदके पटकावली आहेत. जालना येथील एका गरीब कुटुंमध्ये जन्मलेल्या किशोरला पोलिस विभागात नोकरी मिळवण्यासाठी अनेक कष्ट घ्यावी लागली. पण हे ध्येय गाठण्यासाठी अभ्यास करतानाच त्याने बॉडी बिल्डींगचा छंदही जोपासने सुरू ठेवले. आर्थिक तंगीमुळे अनेकदा त्याला सराव सोडवा लागला. पण पोलिसांत नोकरी मिळताच त्याने बॉडी बिल्डींगवर लक्ष केंद्रीत केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा किशोर डांगे यांचे निवडक PHOTOS