आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Police Officer Transfer News In Marathi

निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील 21 अधिकार्‍यांना बढती; लक्ष्मीकांत पाटील सोलापूचे अपर अधीक्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य पोलिस दलात पोलीस उपअधीक्षक तसेच सहायक पोलिस आयुक्तपदी असलेल्या 21 अधिकार्‍यांना पोलिस अधीक्षक व पोलिस उपायुक्त पदांवर बढती देण्यात आली. लक्ष्मीकांत पाटील यांची सोलापूरच्या, तर मारुती कराडेंची बीडच्या अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. याचबरोबर उज्ज्वला बनकर नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या अपर अधीक्षक म्हणून रुजू होतील.

राज्याच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या फोर्स वन, क्यूआरटी, मध्य,पश्चिम रेल्वे तसेच गुप्तवार्ता विभागात बढती देण्यात आली.
बढती मिळालेले अधिकारी : अविनाश अंबुरे- अपर पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण. संदीप पालवे-अपर पोलिस अधीक्षक, फोर्स वन मुंबई. यशवंत सोळंके- अपर पोलिस अधीक्षक, खामगाव (जि. बुलडाणा). संदीप डोईफोडे- पोलिस उपायुक्त, एटीएस मुंबई. लक्ष्मीकांत पाटील- अपर पोलिस अधीक्षक, सोलापूर.
शशिकांत सातव- पोलिस उपायुक्त, जलद प्रतिसाद पथक, मुंबई. दिनेश हागे- समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट 10 सोलापूर. संदीप जाधव- अपर पोलिस अधीक्षक, चाळीसगाव (जळगाव). समाधान पवार- उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई, मोहंमद महबूब मकानदार- अपर पोलिस अधीक्षक, गडहिंग्लज (कोल्हापूर). भारत तांगडे-पोलिस उपायुक्त, नागपूर शहर. तुषार पाटील- अपर पोलिस अधीक्षक, वाशीम.
श्याम घुगे- अपर पोलिस अधीक्षक, भोकर (नांदेड). श्वेता खेडकर- अपर पोलिस अधीक्षक, बुलडाणा. गणेश शिंदे- उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई, अनिता पाटील- अपर पोलिस अधीक्षक, नंदुरबार. उज्ज्वला बनकर- अपर पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक. रूपाली खैरमोडे (अंबुरे)- पोलिस उपायुक्त, मध्य रेल्वे मुंबई. दीपक देवराज-पोलिस उपायुक्त, पश्चिम रेल्वे मुंबई. विजय पवार- पोलिस उपायुक्त, नागपूर.