आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी भागात नेत्यांची धाव! मुख्यमंत्री चव्हाण, राज ठाकरे राज्याच्या दौ-यावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, मंत्र्यांनी आता या भागाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युवक संघटना यांचे विविध भागांमध्ये दौरे सुरू होणार आहेत.

50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या राज्यातील 7054 गावांना विविध सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यामध्ये शेतीशी निगडीत कर्जाला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच अल्प मुदतीतील कर्जाचे रूपांतर मध्यम कर्जात करण्यात येणार आहे. सहकार विभागाने त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांना वीज बिल वसुलीमध्ये 33 टक्के सवलत व विद्यार्थ्यांना परीक्षा फीमाफी सुद्धा देण्यात आली आहे.