मुंबई- केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील ई-रिक्षाचालकांना दिलासा देत त्यावरील बंदी उठवली खरी पण त्याचमुळे ते आता वादात अडकले आहेत. गडकरींनी स्थापन केलेल्या पूर्ती उद्योगसमुहातील एक कंपनी पूर्ती ग्रीन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बॅटरीवर चालणा-या रिक्षांची निर्मिती करते. गडकरींच्या या कंपनीला 2012 मध्येच निर्मिती व विक्री करण्याचा परवाना मिळाला होता. संबंधित कंपनीचे संचालक हे गडकरींचे मेहुणे असल्याचे पुढे येत आहेत. त्यामुळे ई रिक्षावरील बंदी गडकरींनी आपल्या फायद्यासाठी उठवल्याची टीका आम आदमी व काँग्रेस पक्षाने सुरु केली आहे. गडकरी हे महाराष्ट्रातील असल्याने टीका करण्यासाठी यात आता प्रदेश काँग्रेसनेही उडी घेतली आहे. प्रदेश काँग्रेसने गडकरींवर उपासात्मक टीका करताना ते कलियुगातील मसिहा असल्याचे म्हटले आहे.
गरिबातील गरीब माणूस करोडपती व्हावा, हे त्यांचे स्वप्न असून त्याच्या ‘पूर्ती’साठी ते अहोरात्र झटत असतात. त्यांच्या याच स्वप्नातून प्रेरणा घेऊन त्यांचा ड्रायव्हर, अकाऊंटंट व इतर बरेचसे लोक अनेक मोठ्या कंपन्यांचे संचालक झाले आहेत, आता राहिलेला उर्वरित देशही करोडपती लवकरच होईल अशी बोचरी टीका पक्षाच्यावतीने सोशल नेटवर्क साईटवर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या
फेसबुक पेजवर गडकरींवर केलेली उपासात्मक टीका वाचा पुढीलप्रमाणे, ''केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे कलियुगातील आधुनिक मसिहा आहेत. गरिबातील गरीब माणूस करोडपती व्हावा, हे त्यांचे स्वप्न असून त्याच्या ‘पूर्ती’साठी ते अहोरात्र झटत असतात. त्यांच्या याच स्वप्नातून प्रेरणा घेऊन त्यांचा ड्रायव्हर, अकाऊंटंट व इतर बरेचसे लोक अनेक मोठ्या कंपन्यांचे संचालक झाले आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांचे कार्यालय हे फक्त आलिशान इमारतींमध्ये आणि उच्चभ्रू भागातच असावे, हे गडकरींना अजिबात मान्य नाही. त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांनी दुबे चाळीच्या एका खोपट्यातही मोठमोठ्या कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये सुरू केली. यामागे सुद्धा गडकरी साहेबांचीच प्रेरणा आहे, हे कौतुकाने सांगता येईल.
(छायाचित्र- नितीन गडकरी)
पुढे आणखी वाचा, प्रदेश काँग्रेसने गडकरींवर कशी बोचरी टीका आणि
मेव्हण्याच्या इच्छा'पूर्ती'साठी ई-रिक्षांना परवानगी, काही माध्यमांचाही दावा...