आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Public Service Commission Examination Conduct By Old Syllabus Phaujia Khan

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा जुन्याच पध्‍दतीने चालणार - फौजिया खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुन्हा जुन्याच गुण पद्धतीने घ्यावी, अशी शिफारस राज्य शासन आयोगाला करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री फौजिया खान यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.
या परीक्षेसाठी खुल्या वर्गातील महिलांसाठी वयोमर्यादा 33 करावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती. महिलांना सरकारी नोक-यांमध्ये 30 टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय शासनाने 1987 मध्ये घेतला. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगानेही हेच धोरण राबवले असून खुल्या वर्गातील महिलांच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा शासनाचा कोणताही मानस नाही, अशी माहिती खान यांनी दिली. खुल्या वर्गातील महिलांना लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी 30 वर्षे वयोमर्यादा आहे. राजस्थान, गुजरात, हरियाणा या राज्यांमध्ये महिलांना 5 वर्षे अधिक वयोमर्यादा दिली आहे. त्यामुळे तेथे महिला उमेदवार अधिक्याने उत्तीर्ण होतात, असेही मेटे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.


महिला उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटले आहे. मात्र त्यास वयाची अट नव्हे तर परीक्षा पद्धती कारणीभूत आहे. नव्या परीक्षा पद्धतीत 4 उत्तरे चुकल्यानंतर 1 गुण वजा करण्यात येत होता. तसेच प्रत्येक विषयासाठी 45 गुणांची सक्ती करण्यात आली होती. याच पद्धतीचा फटका महिला उमेदवारांना बसला, अशी कबूली खान यांनी दिली. तीन उत्तरे चुकल्यानंतर 1 गुण वजा करण्याची तसेच सर्व विषयात सरासरी 45 गुण मिळवण्याची जुनी पद्धत लागू करावी, अशी शिफारस करू, असेही खान यांनी सांगितले.