आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Sadan And MP Kirit Somaya News In Marathi

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला वाळवी लागली; सीबीआय चौकशी करावी- सोमय्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोट्यवधी रुपये खर्च करून दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदन उभारले, पण त्याला वाळवी लागली आहे. वर्षभरात राज्यपाल कक्षाला लागलेली वाळवी याचे उदाहरण आहे. राहण्याची तसेच जेवणाची तेथे नीट व्यवस्था होत नसल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे महाराष्ट्र सदनात राहत नाही. मुख्यमंत्री येथे राहण्याऐवजी दिल्लीत अनैतिकपणे केंद्र सरकारच्या बंगल्यात राहतात. महाराष्ट्र सदनातील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली.

भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले, राज्यपालांसाठी राखून ठेवलेल्या कक्षाला वाळवी लागल्याचे मी बघितले आहे. केंद्र सरकारच्या हाउसिंग सोसायटीचा मी चेअरमन असल्याने नुकतीच महाराष्ट्र सदनाला भेट दिली. या वेळी इतरही चार कक्षांची अवस्था खराब असल्याचे दिसून आले असून वातानुकूलित यंत्रणा, पंखेही सुरू नसल्याचे ते म्हणाले.

काही ठिकाणी गळती सुरू असून नळामधून घाणेरडे पाणी येत असल्याने तेथे कोणी जायला तयार नाही. मात्र भाजप तसेच शिवसेनेचे मिळून 34 खासदार आज तेथे राहत आहेत. नीट राहण्याची व्यवस्था तर सोडाच, पण तेथे जेवणही नीट मिळत नाही. खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याने तेथे महाराष्ट्रातून कोणी जाण्यास तयार नाही.

साडे सहा हजार कोटींचा घोटाळा
महाराष्ट्र सदनात साडे सहा हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याला सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ तसेच विकासक मे.चमणकर कंपनी जबाबदार आहे. लोकलेखा समितीच्या अहवालातही महाराष्ट्र सदनातील घोटाळ्यावर ताशेरे ओढून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सीबीआय चौकशी झाल्याशिवाय यातील घोटाळा बाहेर येणार नाही, असे सोमय्या म्हणाले.