आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन, समीर भुजबळ यांच्या विरोधात प्रोडक्शन वॉरंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांना विशेष न्यायालयाने बुधवारी हजर (प्रोडक्शन वॉरंट ) राहण्याचे निर्देश दिले. त्यानुसार काका- पुतण्या २२ जून रोजी विशेष न्यायालयात हजर राहणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

सरकारी वकील प्रदीप घरात म्हणाले, भुजबळ काका- पुतण्याला विशेष न्यायालयाने प्रोडक्शन वॉरंट बजावले आहे. सध्या दोघेही मनी लाँडरिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. २२ जून रोजी त्यांना हजर करण्यात येईल. न्यायालयात हजर झाल्यास त्यांच्याविरोधात अजामीन पात्र वॉरंट बजवावे, अशी मागणी घरात यांनी न्यायालयात केली. मात्र, भुजबळ यांच्या वकिलांनी दोघेही न्यायालयात हजर राहतील, असे सांगितले. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी एसीबीने फेब्रुवारी महिन्यात भुजबळ यांच्यासह १७ जणांविरोधात २० हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात ६० जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कंत्राटदारांना ८० टक्के नफा झाला आहे. मात्र, सरकार दरबारी याची नोंद २० टक्के दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले.