आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात स्वाईन फ्लूचा कहर: 520 बळी; तब्बल 15 लाख रुग्णांची तपासणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यात गेल्या आठ महिन्यांत स्वाईन फ्लूच्या आजाराचे 4 हजार 820 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून बळींचा आकडा 510 वर पोहोचला आहे. - Divya Marathi
राज्यात गेल्या आठ महिन्यांत स्वाईन फ्लूच्या आजाराचे 4 हजार 820 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून बळींचा आकडा 510 वर पोहोचला आहे.
मुंबई- राज्यात गेल्या आठ महिन्यांत स्वाईन फ्लूच्या आजाराचे 4 हजार 810 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून बळींचा आकडा 510 वर पोहोचला आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक 54 तर त्याखालोखाल पुणे मनपा क्षेत्रात 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दररोज 14 हजार 581 रुग्णांची तपासणी करण्यात येत असून त्यामध्ये 53 रुग्ण हे बाधित आढळत आहेत. आतापर्यंत राज्यात सुमारे 15 लाख हजार 164 रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळाली. 
 
राज्यात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत केलेल्या पाहणीत स्वाईन फ्लूचे प्रमाण नाशिकमध्ये जास्त वाढले असून त्याखालोखाल पुणे महानगरपालिका क्षेत्र, पुणे ग्रामीण, नागपूर, अहमदनगर, ठाणे, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरांचा क्रमांक लागतो. मृत्यू झालेल्यांमध्ये राज्याबाहेरील कर्नाटक, मध्य प्रदेशमधील रुग्णांचा समावेश आहे. राज्यात दररोज साधारण 383 संशयित रुग्णांना ऑसेलटॅमीवीर दिले जाते. सध्या रुग्णालयात 502 रुग्ण दाखल असून 42 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामध्ये पुणे, नागपूर, चिंचवड मनपा, अहमदनगर येथील रुग्णांचा समावेश आहे. उपचारानंतर 3 हजार 789 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 
 
स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी राज्यातील शासकीय रुग्णालयात प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण शहरी भागात सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम सुरू आहे. स्वाइनची लक्षणे आढळल्यास रुग्णांवर उपचार करण्याच्या सूचना डाॅक्टरांना देण्यात अाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...