आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Sold Rs 100 Crore Plot To Rajiv Shukla's Firm For Under A Lakh

राजीव शुक्लांना दिलेल्या भूखंडाची फाईल मंत्रालयाच्या 'त्या' आगीत जळाली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेसचे नेते व केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या फिल्म सोसायटीला दिलेल्या भूखंडाची फाईल्स गेल्यावर्षी मंत्रालयाला लागलेल्या आगीत नष्ट झाली असल्याची माहिती महसूल मंत्रालयाने दिली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी माहितीच्या अधिकारात शुक्ला यांना 100 कोटी रूपयांचा भूखंड अवघ्या 98 हजारात कसा दिला याची माहिती मागवली होती. त्यावर महसूल मंत्रालयाने हे सोमय्यांना हे उत्तर दिले आहे. दरम्यान, सरकार भ्रष्टाचार लपविण्यासाठीच हा खेळखंडोबा करीत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. हीच फाईल कशी जळाली असा सवाल करीत सोमय्यांनी म्हटले आहे की, ही फाईल जळाली नसून लपविली गेली आहे.
2007 साली तत्कालीन महसूल मंत्री व मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने राजीव शुक्ला यांच्या बॅग्ज फिल्म एज्युकेशन सोसायटीला अंधेरीतील 2821 चौरस मीटरचा सुमारे 100 कोटींचा भूखंड अवघ्या 98 हजारात दिला होता. याचबरोबर या भूखंडाच्या शेजारील सुमारे 3500 चौरस मीटरचा भूखंड 15 वर्षाच्या लीझवर अत्यंत अल्पदरात भाड्याने दिला आहे. दरम्यान, विरोधकांनी काँग्रेसच्या नेत्यांना महाराष्ट्र लूटू देणार नसल्याचे म्हटले आहे. गांधी घराण्याच्या जवळचे असलेल्या राजीव शुक्लांवर राज्य सरकारमधील कोणी-कोणी मेहरबानी याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बॅग्ज फिल्म एज्युकेशन सोसायटीला सुमारे 2821 चौरस मीटरचा दिलेला भूखंड नगरविकास विभागाने नियमबाह्य पद्धतीने दिला असून, महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
पुढे वाचा, याप्रकरणी राजीव शुक्लाचे काय म्हणणे आहे...