आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीसाठी सरकारच्या नावाने विराेधकांचा ‘शिमगा’, केवळ एका तासातच कामकाज तहकूब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही विधिमंडळाच्या दाेन्ही सभागृहात शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून विराेधकांनी सरकारवर टीकेची झाेड उठवत गाेंधळ घातला. त्यामुळे अवघ्या एका तासातच दाेन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.  अधिवेशनच्या पहिल्या दिवशी राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरही काेणतीही चर्चा न करता त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात अाला.  कर्जमाफीसाठी विराेधकांनी केलेल्या गाेंधळामुळे केवळ अर्ध्या मिनिटात आभार प्रदर्शन प्रस्ताव मंजूर करण्याचे साेपस्कार विधानसभेत उरकण्यात अाले.

पहिल्या दिवसापासूनच विराेधकांनी विधानसभेत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला अाहे. शुक्रवारीही हीच परिस्थिती हाेती. विधानसभेत सकाळी ११ वाजता प्रश्नोत्तराच्या तासाने कामकाज अध्यक्षांनी सुरू केले. मात्र, कामकाज सुरू झाल्या-झाल्याच सर्वच पक्षांच्या सदस्यांनी शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत मोकळ्या जागेत धाव घेतली. या गोंधळातच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तरे पुकारली.   मात्र त्यावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कर्जमाफीबाबत बोलण्यास सुरुवात केली. सर्व सदस्यांची शेतकरी कर्जमाफी व्हावी, अशी मागणी आहे.  यावर अध्यक्षांनी ‘तुम्हाला काय म्हणायचे आहे ते ठाऊक आहे’ असे म्हटले आणि कामकाज एका मिनिटातच अर्ध्या तासासाठी तहकूब केले.  
 
कर्जचोरी जोरात, शेतकरी कोमात  
अर्ध्या तासानंतर कामकाज सुरू झाले ते कर्जमाफीच्या घोषणाबाजीनेच. अध्यक्षांनी प्रश्न पुकारले परंतु प्रश्न एकाही अामदाराला त्यात रस नव्हता. गोंधळ वाढल्याने अध्यक्षांनी ११.३२ वाजता पुन्हा कामकाज स्थगित केले.  १२ वाजता पुन्हा गोंधळानेच कामकाजाला सुरुवात झाली. या वेळी ‘कर्जचोरी जोरात, शेतकरी कोमात’ असे फलक काही सदस्यांनी सभागृहात झळकावले. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी या गोंधळातच अभिभाषणावरील आभारप्रदर्शन प्रस्ताव मांडला, ताे गोंधळातच मंजूर करण्यात आला. यानंतर अध्यक्षांनी १२.०४ वाजता कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, बँकांच्या फायद्यात विराेधकांना रस : अर्थमंत्री,
विदर्भातील सावकार नेमके काेणाचे : तटकरे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...