आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारमधील मंत्री करतायेत झोल, झोल; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी गायले हे गीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्य सरकारमधील काही मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आऱोप करत विरोधकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. - Divya Marathi
राज्य सरकारमधील काही मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आऱोप करत विरोधकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला.
मुंबई- राज्य सरकारमधील काही मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आऱोप करत विरोधकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावरच धरणे धरले. सरकारमधील मंत्री करतायेत झोल, झोल असे विडंबन गीतही त्यांनी यावेळी म्हटले. 
 
सुभाष देसाई यांचे निवेदन
 नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा यासाठी यातली 400 एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप विरोधकांनी सुभाष देसाईंवर केला आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आपल्यावरील हे आरोप आज फेटाळून लावले.
 
देसाई यांच्यावरील आरोपांवर आज चर्चा करण्यात आली त्यावेळी त्यांनी हे आरोप फेटाळले. देसाई यांचे आरोपाप्रकरणी निवेदन दिले आहे. विरोधकांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांपाठोपाठ विरोधकांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाईं यांनाही टार्गेट करून सभागृह दणाणून सोडले होते. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...