आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीवरून विरोधकांत समन्वयाचा अभाव, विधानसभेत बेकी, परिषदेत एकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी नाकारल्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात मंगळवारी विराेधक दाेन्ही सभागृहाचे कामकाज विरोधक बंद पाडतील, असे सुरुवातीचे चित्र होते, पण सरकारच्या भूमिकेवर विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. विधानसभेचे कामकाज सुरळीत सुरू राहिले, तर विधान परिषदेत मात्र मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधकांनी कामकाज बंद पाडले.
कर्जमाफीच्या मागणीवरून पहिला अाठवडा काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सरकारला धारेवर धरत कामकाजावर बहिष्कार टाकला हाेता. या विषयावरील चर्चेला उत्तर देताना साेमवारी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणारे सरकारचे धाेरण जाहीर केले. त्यामुळे अाता पुन्हा विराेधक अाक्रमक हाेतील, अशी अपेक्षा हाेती. विधानसभेत मंगळवारी पुरवणी मागण्यांवरील चर्चा तसेच शासकीय कामकाज रोखून धरले जाईल, अशी अपेक्षा होती, पण तसे काही झालेच नाही. याउलट चित्र विधान परिषदेत दिसले.

मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीवरून उत्तर सुरू असताना विरोधकांनी तीनदा जोरदार घोषणाबाजी देत कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. शेवटी मुख्यमंत्र्यांचे उत्तर पूर्ण झाल्यानंतर विरोधकांनी सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करत सभागृह बंद पाडले.

विधानसभेच्या तुलनेत परिषदेत विरोधकांची ताकद चांगली तर आहेच, पण काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये समन्वयही आहे. परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच काँग्रेसचे गटनेते माणिकराव ठाकरे हे विरोधासाठी तरी किमान एकत्र येताना दिसतात. मात्र विधानसभेत राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये समन्वय दिसत नाही. मुख्य म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव पाटील, बाळासाहेब थोरात यांनाही एकत्र आणण्यात विखेंना यश आलेले नाही. याविषयी काँग्रेसचे नेते जाहीरपणे बाेलत नाहीत. मात्र अजित पवार म्हणाले, ‘विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी रणनीती निश्चित करायला हवी. त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले तर विरोधी पक्ष एकत्र येऊन काम करतील.’

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सरकारविरोधात उभे राहणारच : माणिकराव
बातम्या आणखी आहेत...