आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्र अर्थसंकल्‍प 2016 -17 : शेती तालेवार, ग्राहकांवर व्हॅटचा भार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'जय किसान'चा नारा देत युती सरकारचा दुसरा अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर केला. अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगत दुष्काळ निवारणासाठी ३,३६० कोटींसह राज्यातील शेतकऱ्यांसाठी २६ हजार ८९१ कोटींची भरघोस तरतूद केली आहे. हे करत असतानाच मूल्यवर्धीत करात (व्हॅट) ०.५ टक्के वाढ केली आहे. यामार्गाने सर्वच वस्तू महाग करत ग्राहकांच्या खिशावर भार टाकला आहे.
२०१६-१७ हे वर्ष शेतकरी स्वाभिमान वर्ष साजरे करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा सरकारने केली. ३,६४४ कोटी रुपयांची महसुली तुटीच्या या अर्थसंकल्पात शेतक-यांकरिता २६,८९१.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले, वर्षाच्या सुरुवातीला अपेक्षित ३ हजार ७५७ कोटी रुपयांची महसुली तूट वाढून ९२८९ कोटी रुपये झाली. तुटीतील ही वाढ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केल्याने झाल्याचे स्पष्ट करून अर्थमंत्र्यांनी सांगितले,
यंदाच्या अर्थसंकल्पात महसुली जमा २२०८१० कोटी रुपये व महसुली खर्च २२४५५४ कोटी रुपये अंदाजित केला आहे. त्यामुळे ३६४४ कोटी रुपये महसुली तूट येणार आहे. मात्र खर्चात बचत करून व महसूल वसुली अधिक प्रभावीपणे करून ही तूट मर्यादित करण्याचा प्रयत्न करीन, असेही अर्थमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
काय सांगतात आकडे
> २६ हजार कोटींची तरतूद शेतकऱ्यांसाठी
> ०३ हजार कोटी तुटीचा अर्थसंकल्प
> ५०० कोटी ग्रामीण पेयजल योजना राबवण्यासाठी
> २० कोटी तरतूद चंद्रभागा नदीच्या स्वच्छता अभियानासाठी
> ८० कोटी तरतूद तेलबिया व कडधान्य उत्पादन वाढीसाठी
> १००० कोटी राज्यात जलयुक्त शिवार कार्यक्रम राबवण्यासाठी
हेही वाचा,
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, काय झाले स्वस्त - महाग..... व्हॅटची ०.५ टक्के वाढ.....उद्योगांसाठी वीजदर सवलत.....अर्थसंकल्पात औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...