आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिबक सिंचन असेल तरच यापुढे ऊस लागवड करता येणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऊस लागवड करता आता ठिंबक सिंचन बंधनकारक झाले आहे. - Divya Marathi
ऊस लागवड करता आता ठिंबक सिंचन बंधनकारक झाले आहे.
मुंबई- ठिबक सिंचन असेल तरच यापुढे ऊस लागवड करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. ठिबक सिंचनासाठी सरकार २५ टक्के अनुदान देणार असल्याचे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करण्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे.
 
पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतीवर परिणाम

या निर्णयाने मोठया प्रमाणावर पाण्याची बचत होईल, असा दावा करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते. मात्र ऊसाला पाणी देण्यासाठी पाईपलाईन किंवा पाटाचा वापर केला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते आणि जमिनीची धूप होते.

पाण्याची बचत होणे अपेक्षित

जास्त पाणी आणि कमी उत्पादन हे सूत्र बदलण्यासाठी सरकारने  ऊस शेतीसाठी आता ठिबक सिंचन बंधनकारक केले असल्याचे सांगण्यात येत आहे. ठिबक सिंचनामुळे आवश्यकतेनुसार पिकाला पाणी मिळेल आणि  पाण्याचीही बचत होईल, असे मानण्यात येत आहे.