आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तर शाळांचा फाइव्ह डे वीक, राज्य सरकारचा आदेश जुनाच, मात्र शाळांवर सक्ती नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याच्या शहरांमधील प्राथमिक, माध्यमिक शाळांचा आठवडा पाच दिवसांचा करण्याच्या जुन्याच निर्णयाला शिक्षण विभागाने बुधवारी पुन्हा एकदा परवानगी दिल्याचे पत्र दिले. मात्र तो सरसकट लागू नसेल. शाळांनी आरटीई कायद्यानुसार अध्यापनाचे तास पूर्ण करण्याची तयारी दर्शवल्यास पाच दिवस शाळेची परवानगी दिली जाईल. शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी याबाबतच्या सूचना मुंबई विभागीय शिक्षण संचालकांना दिल्या आहेत.

सहा दिवस शाळा चालली पाहिजे, या शिक्षणाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्ये असंतोष होता. याबाबत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन मुंबई विभागीय संचालकांना पाच दिवस शाळा चालविण्याबाबत सूचना दिल्या. याबाबत शिक्षण विभागाने कोणताही नवा अध्यादेश काढला नसल्याचा खुलासा त्यांनी केला.

आरटीई कायदा असा
पहिली ते पाचवीसाठी अध्यापनाचे २००, तर सहावी ते आठवीसाठी २२० दिवस निश्चित आहेत. एप्रिल २०११ च्या अध्यादेशानुसार शाळांनी अध्यापनाचे तास पूर्ण केल्यास त्यांना पाच दिवस शाळेची परवानगी दिली जाऊ शकते.

हा जुनाच निर्णय : तावडे
शाळेच्या तासांबाबत शिक्षण विभागाने घेतलेला हा जुनाच निर्णय आहे. आमच्या विभागाने ५ ते ६ दिवसांच्या आठवड्यासंदर्भात नवा निर्णय घेतला नाही.
- विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री