आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्री पाटील यांचा ‘डबल राेल’; दोन मतदारसंघात पाटील कुटुंबीयांची नावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे अाराेप व मित्रपक्षाकडून काेंडीत पकडण्याचे हाेत असलेले प्रयत्न या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला सामाेरे कसे जावे, या चिंतेत मुख्यमंत्री रविवारी दिसले. - Divya Marathi
भाजप मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे अाराेप व मित्रपक्षाकडून काेंडीत पकडण्याचे हाेत असलेले प्रयत्न या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला सामाेरे कसे जावे, या चिंतेत मुख्यमंत्री रविवारी दिसले.
मुंबई - राज्याचे गृह, नगरविकास राज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एकापेक्षा अधिक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदवणे, शपथपत्रात मालमत्तेची अपुरी माहिती देणे आणि स्वत: िवश्वस्त असलेल्या शैक्षणिक संस्थेस आमदार फंड देणे असे आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले.

डाॅ. रणजीत पाटील यांच्या बेहिशोबी मालमत्तेबाबत काँग्रेसने यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक िवभागाकडे पुराव्यांसह तक्रार केली होती. मात्र पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक िवभागाने सखोल चौकशी न करता क्लीन चीट िदली. लाचलुचपत प्रतिबंधक िवभागात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्ष्ेप असल्यामुळेच डाॅ. पाटील यांना क्लीन चीट िमळाल्याचा आरोप सावंत यांनी केला. पाटील यांनी शपथपत्रात खोटी माहिती देऊन लोकप्रतिनीधी कायद्याचे उल्लंघन केले आहे. ही जबाबादारी स्वीकारुन त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सावंत यांनी केली. तसेच सोमवारी डाॅ. पाटील यांच्या आणखी एका भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
रणजित पाटील यांच्यावर काँग्रेसचे आरोप
आरोप क्र. १
पाटील २०१० मध्ये अमरावती पदवीधर मतदारसंघातून िवधानपरिषदेवर िनवडून आले. त्यावेळी त्यांनी िनवडणूक आयोगाकडे िदलेल्या शपथपत्रात केवळ तीन मालमत्तांचा तपशील िदला आहे. परंतु पाटील यांच्या नावावर प्रत्यक्षात सहा मालमत्ता असल्याचा सावंत यांचा आरोप आहे. मुगशी ता. मूर्तीजापूर, िज. अकोला येथील १. ६२ हेक्टर जमीन, कापशी रोड ता. िज. अकोला येथील १.२४ हेक्टर जमीन आणि अकोला येथील २.०२ हेक्टर जमीन डाॅ. पाटील यांनी दाखवली नसल्याचे सावंत यांनी सांगितले.
आरोप क्र. २
डाॅ. पाटील यांनी नितीन विद्यालय, भटोर, ता. मुर्तिजापूर, देवकाबाई िवद्यालय, घुंगशी, ता. मूर्तीजापूर, आणि िववेकांनद महाविद्यालय, मंगरुळ कांबे, ता. मूर्तीजापूर, या ३ िवद्यालयांना २०१०-११ मध्ये स्वत:च्या आमदार निधीमधुन एक लाखांचा िनधी िदला होता. िवशेष म्हणजे ही तीनही महाविद्यालये पयोष्णी िशक्षण संस्थेची असून या संस्थेचे डाॅ. पाटील स्वत: िवश्वस्त आहेत. सार्वजनिक प्रतिनिधित्व कायद्यांतर्गत स्वत:च्या ट्रस्टला निधी देता येत नाही.

आरोप क्र. ३
डाॅ. रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्जात त्यांची मुलगी जाई (कश्मीरा) हिच्या नावे संपत्ती निरंक दर्शवली आहे. मात्र प्रत्यक्षात जाईच्या नावे मलकापूर मध्ये दोन प्लाॅट असल्याचा दावा सावंत यांनी केला. तसेच मलकापूर, ता. िज. अकोला येथे ०.०५.३४ हे आर. चौ. मी. आणि १०.७० हे. चौ. मी. या दोन मालमत्तांचे त्यांनी उतारे दिले.

आरोप क्र. ४
डाॅ. रणजित पाटील यांनी स्वत:सह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची दोन दोन मतदार याद्यांत नावे असल्याची माहितीही सावंत यांनी यावेळी िदली. पाटील कुटुंबीयांची नावे अकोला पूर्व आणि मूर्तीजापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केलेला खुलासा