आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याला भूकंपाचा धोका नाही, इमारती भक्कम हव्यात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भविष्यात ७ पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपाची भीती मुंबईसह महाराष्ट्रातल्या कोणत्याच शहराला नाही. उघड्या आकाशाखाली जमिनीवर उभे असताना कितीही मोठ्या शक्तीचा भूकंप झाल्यास फार तर तुम्ही पडण्याशिवाय वेगळा धोका होऊ शकत नाही. जीवितहानी टाळण्यासाठी इमारती मात्र भक्कम आणि भूकंपरोधी हव्यात, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भूकंपशास्त्रज्ञ डॉ. अरुण बापट यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.

डॉ. बापट म्हणाले, भूगर्भातील भू-भ्रंश (जिऑलॉजिकल फॉल्ट) आणि जमिनीची घनता यावर भूकंपाची तीव्रता अवलंबून असते. भूगर्भात सुमारे २० ते २५ किलोमीटर लांबीचे फॉल्ट असले की तीव्र भूकंपाचा धोका अधिक असतो. महाराष्ट्रात असे फॉल्ट नसल्याने जास्तीत जास्त साडेसहा तीव्रतेचे भूकंप झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. किल्लारी व कोयना या दोन्ही ठिकाणचे भूकंप साडेसहा शक्तीचे होते. हे अपवाद वगळता महाराष्ट्रातील आजवरचे भूकंप कमी तीव्रतेचे होते. ५ शक्तीच्या भूकंपाने हानी होत नाही. त्यामुळे महाराष्ट्राने चिंता करण्याची स्थिती नाही. भूकंप ही घटनाच मुळात निरुपद्रवी असते. वीज, पूर आदी नैसर्गिक संकट थेट जीवघेणे ठरू शकते.