आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Transport Ticket Hike On First July

एसटीचा प्रवासही महागणार; भाडेवाढ एक जुलैपासून लागू?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महागाईने आधीच हैराण असलेल्या जनतेला आता एसटी भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे. एसटी महामंडळाने 12 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला होता. परंतु राज्य परिवहन प्राधिकरणाने तो नाकारून 6.69 टक्के भाडेवाढीला हिरवा कंदिल दाखवला आहे. यामुळे एक जुलैपासून ही भाडेवाढ लागू केली जाणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्य परिवहन प्राधिकरणामध्ये मंत्रालयात काल (शुक्रवारी) बैठक झाली होती. या बैठकीत भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली. भाडेवाढी माहिती लवकरच एसटी महामंडळाला ‍दिली जाणार असल्याचे राज्य परिवहनचे सचिव शैलेश कुमार शर्मा यांनी सांगितले. यापूर्वी 2012 मध्ये तिनदा भाडेवाढ करण्यात आली होती.

कर्मचार्‍यांना पगार वाढ; प्रवाशांवर भार
महामंडळाने नुकतीच कर्मचार्‍यांना पगारवाढ केली होती. त्यामुळे येणारी तूट भरून काढण्यासाठी भाडेवाढ करून हा बोजा प्रवाशांवर टाकण्यात आला आहे. एसटीचे किमान भाडे एक रुपयाने वाढणार आहे.

भाडेवाढीचा फटका वारकर्‍यांना...
एक जुलैपासून एसटी भाड्यात वाढ केली जाणार आहे. याचा याचा पहिला फटका पंढरपूरला मोठ्या संख्येने जाणार्‍या वारकर्‍यांना बसणार आहे.