आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Vote Of Account Budget Live From Mumbai

BUDGET: निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी सादर केला \'फिल गुड\' अर्थसंकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थात लेखानुदान आज दुपारी सादर केला. दुपारी दोन वाजता लेखानुदान मांडण्यास पवार यांनी प्रारंभ केला व तो 40 मिनिटांत संपला. सध्याच्या विधानसभेतील त्यांचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता. दलित, मागासवर्गीय, उद्योग क्षेत्र, नोकरदार, महिला, युवावर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने यातून केल्याचे दिसून आहे.
पुढे वाचा, काय-काय आहे चार महिन्याच्या बजेटमध्ये...
- 10 हजार शेततळी बांधेपर्यंत अनुदान सुरुच राहणार
- अन्न सुरक्षेचा लाभ राज्यातील 7 कोटी जनतेला
- राजीव गांधी जीवनदायी योजनेकरिता 698 कोटी रूपये
- रोजगार हमीसाठी 250 कोटी रूपये
- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 81 कोटी
- सुकन्या योजनेसाठी 115 कोटी
- रस्ते विकासासाठी 2836 कोटी रूपये
- वीज सवलतीसाठी 9 हजार कोटीची तरतूद
- अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागासाठी 40 कोटी
- 25 मोठ्या प्रकल्पासाठी 9725 कोटींची तरतूद
- राज्यात 1450 जवाहर विहरींचे काम
- तंत्र शिक्षणासाठी 130 कोटी रूपये
- 61 हजार पोलिस पदांची भरती, पहिल्या टप्प्यात 12 हजार पोलिस भरणार
- 2378 कोटी रूपये नाशिक सिंहस्थ कुंभमेळाव्यासाठी
- घरकुल योजनेसाठी 333 कोटी रूपये
- 12 मागास जिल्ह्यासाठी 395 कोटी रूपये
- नागपूरमधील मिहान प्रकल्पासाठी 250 कोटी रूपये
- मराठी भाषा विकासासाठी 15 कोटी 60 लाख रूपये
- नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 8680 कोटी रूपये
- गेल्या दहा वर्षात दरडोई उत्पन्नात दुप्पट वाढ
- सर्वांसाठी वीज दरात 20 टक्क्यांनी कपात
- 2018 पर्यंत नवी मुंबई विमानतळाचे चार टप्पे पूर्ण करणार
- कराड, अमरावती, जळगाव आणि सोलापूरला नवीन विमानतळं होणार
- जलसंपदा विभागातील विविध कामांसाठी 8215 कोटी रुपयांची तरतूद
- जीवनावश्यक वस्तुंवरील व्हॅटची सवलत कायम राहणार
- सोलापूर चादर, मनुका स्वस्त होणार
- व्याघ्र आणि पक्षीसंवर्धनसाठी 35 कोटी रूपये
- नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा 2018 पर्यंत
- राज्यातील नवीन विमानतळ उभारणीसाठी 165 कोटी
- महिला बालसुरक्षेसाठी 105 समुपदेशन केंद्र स्थापणार
- जलस्वराज्य योजना देशात पहिल्यांदाच
- मौलाना आझाद मोफत शिक्षण योजना राबवणार
- लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी 15 कोटी 10 लाखांची तरतूद
- अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
- ठेवी बुडालेल्या उपवर मुलींच्या पालकांना 1 लाखांची मदत
- अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर 1 लाख रुपये
- राज्यात 10 हजार शेततळी होईपर्यंत योजना सुरू राहणार
- शेततळ्यांना 25 हजार रुपयांचं अनुदान देणार
- घरकूल योजनेसाठी 675 कोटींची तरतूद
- ग्रामीण, शहरी भागात रमाई घरकूल योजना
- भांडवली खर्चासाठी 2 हजार 253 कोटी