आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऊसतोड कामगारांची िदवाळी यंदा संकटात चाळीस वर्षांत प्रथमच गाळप हंगाम पुढे गेला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दरवर्षी आॅक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीस सुरू हाेणारा ऊस गाळप हंगाम यंदा पहिल्यांदाच डिसंेबरमध्ये सुरू होणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यंदाचा गाळप हंगाम पुढे गेल्याने चांगलेच आनंदात आहेत. परंतु लांबलेल्या गाळप हंगामाने राज्यातील दहा लाख ऊसतोड कामगारांच्या िदवाळीवर मात्र संक्रांत आणली आहे.
दुष्काळामुळे राज्यात यंदा ऊस क्षेत्र कमी आहे. पाण्याअभावी फडातील उभ्या उसाची वाढही थांबली हाेती. त्यामुळे गेल्या चाळीस वर्षांत प्रथमच गाळप हंगाम पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. ऊसतोड पुढे गेल्याने उसाला चांगले वजन येईल, असे शेतकऱ्यांचे गणित आहे, तर पक्व उसामुळे साखर उतारा वाढेल, असे साखर कारखान्यांना वाटत आहे. त्यामुळे कारखानदार आणि शेतकरी गाळप हंगाम पुढे गेल्याने आनंदात आहेत. खरिपातील रोजगार संपल्यावर ऊसतोड कामगार कारखान्यांकडे वळत असतो. एका कारखान्याकडे सुमारे ४ हजार जोडपी ऊसतोडीचे काम करतात. कामगारांच्या मुकादमाला कारखान्यांकडून अॅडव्हान्स िदला जातो. मुकादम तो मजुरांमध्ये वाटतो. तसेच दर पंधरा िदवसांनी कारखान्यांकडून टनाला २२८ रुपयांप्रमाणे ऊसतोडीचे पेमेंट केले जाते. त्यामुळे ऐन िदवाळीच्या काळात कामगारांच्या हाती चार पैसे असतात.
यंदा पहिल्यांदाच गाळपाच्या कालावधीत खंड पडला आहे. राज्यात दहा लाख ऊसतोड कामगार आहेत. ते बहुतांश मराठवाड्यातील आठ, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील पाच िजल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील नऊ तालुक्यातील अाहेत. देशात िदवाळी मोठा सण असतो. नेमक्या याच िदवाळ सणाला यंदा प्रथमच कामगारांना आर्थिक चणचण जाणवणार आहे.
रोजगाराची अडचण नाही
मागच्या वर्षी १७७ कारखान्यांनी हंगाम घेतला आहे. यंदा १५५ कारखाने हंगाम घेणार आहेत. यंदा हंगाम तर विलंबाने चालू होणार आहेच, अल्प उसामुळे त्यात परत हंगामाचे िदवस केवळ ९० ते ११० िदवस राहतील. त्यामुळे राज्याच्या सीमावर्ती भागातील सुमारे दोन लाख ऊसतोड कामगार शेजारच्या कर्नाटक आणि गुजरात राज्यात जाण्याची शक्यता आहे. हंगाम पहिल्यांदा पुढे नेला आहे. पण यंदा पाऊसच उशिरा झाला. त्यामुळे गावात अजून शेतीची कामे बाकी आहेत. परिणामी रोजगाराची विशेष अडचण नाही, असे राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...