आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: नन्नाचा पाढा वाचणाऱ्या सरकारची ‘अंत्ययात्रा’; वाचा, खडसे का म्हणाले- हे कसले सरकार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारणाऱ्या सरकारविराेधात  काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या अामदारांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. - Divya Marathi
शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारणाऱ्या सरकारविराेधात काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या अामदारांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.
मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरुवातीपासून संघर्षाचा पवित्रा घेणाऱ्या विरोधी पक्षांनी मागणी मान्य होत नसल्याचे पाहून संघर्ष यात्रेचा निर्णय घेतला. पण, सरकार शेतकऱ्यांच्या प्रती गांभीर्य दाखवत नाही, हे पाहून संतापलेल्या विरोधकांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी स्टेट बँकचे कार्यालय तसेच विधानभवन परिसर अशी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा  काढली.
 
कर्जमाफीचा निर्णय हाेत नसल्याने विरोधक शुक्रवारीही सभागृहाकडे फिरकले नाहीत. पण, आपला आक्रमक निषेध सरकारपर्यंत जावा, यासाठी अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. राधाकृष्ण विखे पाटील व अजित पवार यांनी तिरडीला खांदा दिला. तर, जितेंद्र आव्हाड मडके घेऊन चालत होते. या वेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा VIDEO
- मंत्री दुसऱ्याकडे शिफारस कशी करू शकतो, खडसेंचा सरकारला घरचा आहेर
- मुख्यमंत्री म्हणाले- हरल्यानंतर विरोधकांना कर्जमाफीची आठवण
- युती मोडीत काढण्याची हीच योग्य वेळ 
- वाचा, कोण म्हणाल- फडणवीसांना मोदींपेक्षा जास्त कळते का? 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...