आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच वर्षांपूर्वीच बांधलेली चार मजली इमारत कोसळून 3 ठार; भिवंडीतील दुर्घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भिवंडी- निझामपूर महापालिका हद्दीत शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली दबलेले तीन मृतदेह काढण्यात आले असून यात नऊ रहिवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

  
रुकसार खान (१८), अश्फाक खान (४० ) आणि झैबुन्निसा अन्सारी (६०) अशी मृतांची नावे अाहेत. मृतांमध्ये १७ वर्षीय मुलीसह एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त हाेत अाहे.  मागच्या वर्षी भिवंडीत इमारत कोसळून अठरा रहिवाशांचा बळी गेला होता, आजच्या घटनेनंतर भिवंडीतील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.   


कोरी बंगाल ही पाच वर्षांपूर्वी बांधलेली इमारत शुक्रवारी सकाळी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ढासळलेल्या इमारतीचा मलबा हटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. जखमींवर भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय आणि ठाण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.  घटनेची माहिती मिळताच नवी मुंबईतील तळोजा येथून आपत्ती निवारण दलाचे ४० जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यामध्ये मदतीला पालिका कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान कार्यरत आहेत.  


ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि भिवंडीत लवकरच धोकादायक इमारतींसाठी क्लस्टर प्रकल्प राबवण्यात येईल, असे जाहीर केले. यंत्रमागनगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडीत ७८२ धोकादायक इमारती असून त्यामध्ये अडीच हजार कुटुंबे वास्तव्यास आहेत. अनधिकृत इमारती उभ्या राहण्यास मदत करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी कारवाई करावी, अशी मागणी भिवंडीतील नागरिक करत आहेत.  

 

पुढे स्लाईडवर पाहा, या घटनेतील फोटोज आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...