आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासनपूर्ती : १२ टोलनाके पूर्णपणे बंद, ५३ नाक्यांवर टोलमाफी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘महाराष्ट्र टोलमुक्त करू’ या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पहिले पाऊल टाकले. राज्यातील १२ टोलनाके कायमचे बंद आणि ५३ नाक्यांवर जीप, कार व एसटी बसला टोलमाफीची घोषणा त्यांनी केली. ३१ मेच्या मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणी होईल. ‘दिव्य मराठी’ने २६ मार्च रोजीच असा निर्णय होेणार असल्याचे वृत्त दिले होते.

विधानसभेत निवेदन करताना फडणवीस म्हणाले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमुक्तीचा निर्णय अतिरिक्त मुक्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर घेण्यात येईल.
या नाक्यांवर टोलमाफी
- औरंगाबाद- जळगाव रस्ता : सावंगी
- औरंगाबाद- पैठण रस्ता : नक्षत्रवाडी
- औरंगाबाद- जालना रस्ता : लाडगाव,नागेवाडी
- नांदेड- नरसी रस्ता : बरबडा
- जालना- वाटूर रस्ता : पिंप्री फाटा

‘टोलमाफीच्या नाक्यांची वाहनधारकांना माहिती व्हावी म्हणून संबंधित टोल नाक्यांवर ‘चारचाकींना टोलमुक्ती’ असे फलक लावण्यात येतील. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री