आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Toll Issue, Govt May Declered New Policey On Wed

मंत्रिमंडळाच्या उद्याच्या बैठकीत टोल धोरण स्पष्ट करणार- हर्षवर्धन पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना टोलमध्ये पारदर्शकता येत नाही तोपर्यंत टोल भरू नका, आडवे कोणी आले तर त्याला तुडवा असा आदेश देताच महाराष्ट्रभर मनसेने टोल तोडफोड सुरू केली. त्याचाच परिणाम म्हणून सरकारने दुस-याच दिवशी तत्परता दाखवली. बुधवारी (29 जानेवारी) होणा-या कॅबिनेटच्या बैठकीत आगामी काळात राज्यातील टोलविषयक धोरण काय असेल ते स्पष्ट करणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रत्नागिरी येथे दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील आठवड्यातच टोल वसुलीबाबतचा असंतोष लक्षात घेता 8-10 दिवसात नवे टोल धोरण जाहीर केले जाईल, असे सांगितले होते. राज्यात टोलविरुद्ध आंदोलने सुरु असल्याने शासन यावर गांभीर्यपूर्वक विचार करत असल्याचे म्हटले होते. तसेच त्यानंतर या विषयावर नवे धोरण तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार रविवारी राज ठाकरेंनी प्रभोषक भाषण करून टोलफोडीचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर रविवारी रात्रभर व सोमवारी दिवसभर राज्यातील टोलनाक्यावर मनसेकडून तोडफोड सुरु होती. अखेर जनभावनेचा आदर करून आम्ही बुधवारी होणा-या मंत्रिमंडळ बैठकीत भविष्यात राज्यात टोलचे धोरण काय असेल हे स्पष्ट करणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.
पुढे वाचा, तोडफोडीनंतर आजपासून टोलवसुली पुन्हा सुरु....