आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगारात महाराष्ट्र अव्वल; पुणे पहिले, औरंगाबाद तिसरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- औद्योगिकप्रगती रोजगारनिर्मितीच्या प्रांतात महाराष्ट्रच देशात अव्वल असल्याचे केंद्र सरकारच्या सहाव्या आर्थिक गणनेतून स्पष्ट झाले आहे. २००५च्या पाहणीच्या तुलनेत २०१३मध्ये रोजगारांत ३६.५ टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. रोजगारवाढीची राष्ट्रीय सरासरी ३४.५ टक्के आहे.
जनगणनेच्या धर्तीवर केंद्र सरकार दर ८-१० वर्षांनी आर्थिक गणना करते. १९८०, १९९०, १९९८ २००५ मध्ये ती झाली होती. राज्यात आॅक्टोबर २०१३ ते एप्रिल २०१४ या काळात ही गणना झाली. राज्य सरकारने विधिमंडळात मांडलेल्या आर्थिक पाहणीत निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार कोटी ४३ लाख ८० हजार लोक कारखाने, कंपन्यांत नोकरी करतात. देशातील राेजगारप्राप्त लोकांत सर्वाधिक ११.२६ टक्के राज्यात आहेत. यात सरकारी, निमसरकारी नोकरदार नाहीत.

टक्के रोज गार नागरी उद्योगांत- ५४.१
टक्के उद्योग नागरी भागात -४२.७
टक्क्यांनी वाढ २००५च्या तुलनेत- ४६.५
लाख उद्योग आस्थापना राज्यात -६१.३
कृषी -४९.३
सेवा-१७.५
वस्तुनिर्माण-११.५
बांधकाम- ६.९
व्यापार- ९.५
वाहतूक- ४.९
शेतीच उत्तम, सेवा क्षेत्र दुसरे
सर्वाधिक रोजगार शेतीनेच पुरवला आहे. राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयानुसार रोज उपलब्ध रोजगारात निम्मा वाटा शेतीचाच आहे. सेवा क्षेत्रात सुमारे १८ टक्के रोजगार मिळतो.
महसुली विभागानुसार पुण्यात सर्वाधिक रोजगार, पाठोपाठ नाशिक, तर औरंगाबादचा तिसरा क्रमांक आहे. आकडे पाहता औरंगाबाद नाशिकमध्ये काट्याची लढत दिसते.