आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याचे १२०० पर्यटक सुखरूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नेपाळच्या भूकंपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. रविवार सकाळपर्यंत ६० पर्यटकांना भारतात परत आणण्यात आले. मुंबई नवी दिल्ली नियंत्रण कक्षातून रविवारी सायंकाळी वाजेपर्यंत नेपाळमधील महाराष्ट्राच्या हजार पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था परराष्ट्र मंत्रालय करत आहे. संपर्क झालेल्यांत नांदेडचे ४८, वाशीम-अकोला-यवतमाळ जिल्ह्यातील १५६, ठाण्यातील ७, पिंपरी चिंचवडच्या ८, साताऱ्याच्या ६, हडपसर येथील ५, खानापूर-आटपाडी या सांगली परिसरातील १०० पर्यटकांचा सहभाग आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था आहे.