आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजीराव देशमुखच सभापती! मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पुन्हा विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधान परिषदेच्या सभापतिपदी अखेर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचीच फेरनिवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शरद रणपिसे यांच्या नावासाठी वरिष्ठ नेत्यांकडे वजन खर्ची केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मनसुबे उधळून लावत देशमुखांचेच नाव निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राज्यातील कॉँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात मुख्यमंत्री चव्हाण यांचेच पारडे पुन्हा जड असल्याचे सिद्ध होत आहे.

सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यासह काही सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने विधान परिषदेची पुन्हा निवडणूक घेण्यात आली होती. यात शिवसेनेतर्फे राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल करून निवडणुकीत चुरस आणली होती, परंतु ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी नार्वेकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने आठही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान, सभापतिपदाच्या निवडीसाठी 8 मे रोजी परिषदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. खरे तर पुढील महिन्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मात्र 16 मे रोजी लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत कॉँग्रेसला संशय असल्याने त्यांनी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा घाट घातला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, देशमुखांना ठाकरेंचा विरोध