आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Vidhanparishad Election Congress And Ncp Intrested In Three Sits

विधानपरिषद निवडणूक रंगतदार होणार, काँग्रेस चार जागा लढविण्याच्या तयारीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/दिल्ली - महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूकीसाठी काँग्रेसने तीन नावे निश्चित केली आहेत. दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीत विधानपरिषदेच्या चार जागा लढविण्याचे ठरले असून तीन उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत.
काँग्रेसच्या तीन जागा सहज निवडून येतील एवढे संख्याबळ त्यांच्याकडे आहे मात्र, चौथ्या उमेदवारासाठी बाहेरच्या मतांची गरज आहे. त्यामुळेच चौथ्या उमेदवाराचे नाव अजून निश्चित झाले नसल्याचे सुत्रांनी सांगितले. याबाबत काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेचे तीन उमेदवार जाहीर केले आहेत. अरुण गुजराथी आणि उषा दराडे यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली असून पुण्याचे जयदेव गायकावड, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि बीडचे अमरसिंह पंडीत या तिघांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी केली.
विधानपरिषद निकाल- नाशिकमध्‍ये राष्‍ट्रवादीचे जयंत जाधव चिठ्ठीद्वारे विजयी
राष्ट्रवादीचे हात वर, काँग्रेस अडचणीत!
सर्व नाराजांना काँग्रेस कार्यकारिणीत जागा मिळणार