आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा सुटेना, विधान परिषद ठप्पच; विराेधकांसमाेर सरकार हतबल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, या मागणीसाठी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा िवधान परिषदेत कामकाज होऊ शकले नाही. ‘अाधी कर्जमाफी मगच कामकाज’ या निर्णयावर िवरोधक ठाम असल्याने फडणवीस सरकार परिषदेत काेंडीत सापडले अाहे.

बुधवारी दुपारी १२ वाजता सभागृह सुरू होताच राष्ट्रवादीचे गटनेते सुनील तटकरे यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात २८९ च्या प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. ‘मुख्यमंत्र्यांनी िवदर्भातील ज्या गावात मुक्काम केला आणि सरकार शेतकऱ्यांबरोबर असल्याचे आश्वासन िदले, त्या गावातील शेतकरी अाता आत्महत्या करत आहेत. सरकार आपल्याला आधार देऊ शकत नाही, अशी शेतकऱ्यांची खात्रीच झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची िवश्वासार्हता संपुष्टात आल्याचा हा पुरावाच आहे’, अशी टीका तटकरे यांनी केली.

‘एकीकडे मुख्यमंत्री कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे सरकारमधीलच िशवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, असे म्हणत आहेत. मग कर्जमाफीवर सरकारची भूमिका नेमकी कोणती, याची माहिती सभागृहाला झाली पाहिजे. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून कर्जमाफीसंदर्भात २८९ च्या प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे. तोपर्यंत सभागृह आम्ही चालू देणार नाही’, असा इशारा तटकरे यांनी िदला.
काँग्रेसच्या वतीने शरद रणपिसे यांनी कर्जमाफीसंदर्भात प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. राज्यातील शेतकऱ्यांनी अच्छेे िदन येण्यासाठी आता २५ वर्षे वाट पाहायची काय, असा उपरोधिक सवाल रणपिसे यांनी केला.

सभागृहाचे नेते, कृषिमंत्री एकनाथ खडसे सरकारच्या वतीने बोलण्यास उभे राहिले. खडसे उठताच िवरोधी सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. सरकारच्या िनषेधाच्या घोषणा िदल्या. बॅनर फडकवण्यात आले. कागद फाडून सभागृहात िभरकावले गेले. तरीही खडसे मात्र बोलतच राहिले. वाढता गोंधळ पाहून सभापती रामराजे नाईक िनंबाळकर यांनी सभागृह तासाभरासाठी तहकूब केले. त्यानंतर सभागृह चालवण्याचा तालिका सभापती जनार्दन चांदूरकर यांनी दोन वेळा प्रयत्न केला, परंतु िवरोधकांच्या नारेबाजीमुळे सभागृह चालू शकले नाही. शेवटी उपसभापती वसंत डावखरे यांनी सभागृह िदवसभरासाठी तहकूब केले.

पाप तुमचे, राज्याला फटका
गोंधळच घालायचा हे िवरोधक ठरवून आलेले आहेत. आघाडीच्या कारभारामुळे राज्य कर्जाच्या खाईत गेले अाहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या काही सहा महिन्यांच्या काळातील नाहीत. तुम्ही पाप केले, त्याची फळे राज्य भोगत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर िवरोधक गंभीर नाहीत. सरकारची कर्जमाफीसंदर्भात चर्चा करण्याची केव्हाही तयारी आहे, पण िवरोधकांनाच चर्चा नको आहे, असे आरोप खडसे यांनी केले. तरीही गाेंधळ सुरूच हाेता.
बातम्या आणखी आहेत...