आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Vidhansabha Election 2014 Amit Shaha News In Marathi

अमित शहा ठरवणार युतीचे भवितव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुतीतल्यातणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत येत आहेत. शिवसेना- भाजपमधील वादाबाबत ते नेमके काय संकेत देतात, त्यावर महायुतीच्या रखडलेल्या जागा वाटपाच्या चर्चेचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, कुरबुरी थांबवून जागावाटप निश्चित करण्यावर शहा यांचा भर असेल, असे सांगितले जाते.
अमित शहा १७ १८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येत आहेत. बुधवारी दुपारी ते मुंबईत दाखल होतील. संध्याकाळी भाजपच्या नेत्यांची बैठक घेतल्यानंतर रात्री पारितोषिक वितरण समारंभाला हजेरी लावतील. गुरुवारी सकाळी ते कोल्हापूरात जाऊन श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतील. त्यानंतर कारने बारामतीला तेथून चौंडीकडे (जि. नगर) रवाना होतील. तेथे पंकजा मुंडेंच्या संघर्ष यात्रेच्या समारोपानिमित्त सभा होणार आहे. त्यानंतर रात्री पुण्यात मेळावा होणार आहे. दरम्यान, १९ सप्टेंबरचा त्यांचा गोंदिया अमरावतीतील दाैरा मात्र रद्द झाला आहे.