आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Vidhansabha Election 2014 Rashtravadi Congress News In Marathi

राष्ट्रवादीत आलेल्या अपक्ष आमदारांनी केली मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारीची कोंडी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुतीतीलघटक पक्षांनी आपल्याच उमेदवाराला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची संधी मिळायला हवी, असा आग्रह धरला आहे. हे कमी म्हणून की काय आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या अपक्ष आमदारांनीही मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचे ठरवलेले दिसत असल्याचे चित्र समोर आले आहे.
मुख्यमंत्री दक्षिण कराडमधून लढण्यास उत्सुक आहेत. मात्र, या मतदारसंघामधील काँग्रेसचे आमदार विलासकाका उंडाळकर यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. आपल्याला उमदेवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून उभे राहण्याचे त्यांनी ठरवले असून नवी मुंबईत झालेल्या माथाडी कामगारांच्या मेळाव्यात त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली होती. यामुळे मुख्यमंत्र्यांची पंचाईत झाली असताना आता अपक्ष आमदार पृथ्वीराजांना जेरीस आणण्यासाठी पुढे सरसावले आहेत.दिस
उत्तर कराडमधील अपक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांचे दक्षिण कराडमध्ये मोठे काम आहे.
पुनर्रचनेत आपण कार्य केल्याचा भाग कराडमध्ये गेल्याची खंत बाळासाहेबांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सह्याद्री साखर कारखाना, शिवाजी विद्यापीठ शिक्षण संस्था तसेच नगरपालिका माझ्या ताब्यात आहेत. त्यामुळे माझ्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री जिंकून येणे शक्य नाही.
विलासकाका उंडाळकरांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला आणि बाळासाहेब पाटील यांनी पाठिंबा दिला नाही तर मुख्यमंत्री वाईकडे सरकू शकतात. मात्र, वाईचे अपक्ष आमदार असलेल्या मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आपली उमदेवारी बळकट केली आहे. तेसुद्धा कुठल्याही परिस्थितीत आपला मतदारसंघ मुख्यमंत्र्यांना सोडणार नाहीत, हे निश्चित.
कराडकडेआता लक्ष गेले! पृथ्वीराजचव्हाणांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या तीन वर्षांत कराडकडे लक्षच दिले नाही. विधानसभेची निवडणूक लढवण्याचा िनर्णय घेतल्यानंतर दोन महिन्यांपासून त्यांनी या भागात निधी द्यायला सुरुवात केल्याची भावना येथील मतदारांत आहे.
मुख्यमंत्र्यांकडे कार्यकर्त्यांची फळीच नाही.

काही निवडक माणसांच्या हाती त्यांनी सूत्रे दिल्यामुळे कराडचा अपेक्षित विकास झाला नाही. ही निवडक माणसे मंगळवार ते शुक्रवार मुंबईत असतात आणि सुट्ट्यांमध्ये कराडमध्ये येतात. त्यामुळे त्यांना येथील लोकांचे प्रश्न कसे िदसणार, असे लोक उघड बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले नाही, याकडे आमदार बाळासाहेब पाटील यांनी लक्ष वेधले.