सोलापूर - सोलापूर मध्य निवडणुकीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या आडम २४ सप्टेंबर रोजी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य खासदार सीताराम येचुरी, प्रदेश सचिव डॉ. अशोक ढवळे येणार आहेत. कष्टकरी कामगारांच्या विराट पदयात्रेने अर्ज भरणार असल्याची माहिती निवडणूक प्रचार प्रमुख अॅड. एम. एच. शेख यांनी टिली. आडम यांच्या प्रचारात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते युवकांशी हितगुज करतील.
श्रमिकांनी दिले ३० लाख
लालबावट्यावरच श्रमिकांचा विश्वास आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांचे अनेक प्रश्न सुटण्याऐवजी जटिल होऊन बसले. या पार्श्वभूमीवर कामगारांचाच प्रतिनिधी सभागृहात पोहोचवण्यासाठी ३० हजार श्रमिकांनी ३० लाख रुपये दिले. त्यांच्या विश्वासाच्या जोरावरच ही निवडणूक लढवत आहे, असे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले.