आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्हिजिट महाराष्ट्र इयर’ची घोषणा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -पर्यटन क्षेत्रातील संधी व पर्यटन विकासाच्या शक्यता याकडे आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांचे लक्ष वेधण्यासाठी ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’ हा उपक्रम निश्चित उपयुक्त ठरेल. वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रातील भागीदारांना एकत्रित आणण्याचे काम या माध्यमातून होत आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त येथे केले.
मुंबई एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन ३० सप्टेंबरपर्यंत सुरू असेल. या वेळी अभिनेता अमिताभ बच्चन यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र निसर्गसमृद्ध राज्य असून येथे पर्यटनाला वाव आहे. शासनाकडून पर्यटनवृद्धीसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी होत आहे. २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र इयर’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील पर्यटक, गुंतवणूकदार, टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रतिनिधींच्या सहभागामुळे पर्यटनविषयक चालना मिळेल.