आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनी मंत्रालयातही ‘कमळा’चे पीक; भाजप पहिल्या, तर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या राज्यातील एकूण 25 जिल्हा परिषदांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जवळपास सर्वच जिल्ह्यांत आघाडी घेतली असली तरी मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये काही अपवाद वगळता ‘त्रिशंकू’ स्थिती असल्याचे दिसून येते.

शिवसेनेशी 25 वर्षांचे ‘मैत्रबंध’ तोडून प्रथमच स्वबळावर महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरे गेलेल्या भाजपने अभूतपूर्व यश मिळवले आहे. दहापैकी आठ महापालिकांत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला आहे, तर 25 जिल्हा परिषदांमध्येही भरीव यश मिळवले आहे. सुमारे पंधरा वर्षे राज्य शासन बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडांना सुरुंग लावून ते ताब्यात मिळविण्यात भाजपला यश आले आहे. त्रिशंकू अवस्थेत अडकलेल्या मुंबई महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी शिवसेना- भाजपत युतीचे प्रयत्न यशस्वी झाले तर तो फॉर्म्युला राज्यातही राबविला जाईल. तसे झालेच तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात जाऊ शकणाऱ्या आठ जिल्हा परिषदा तीन मनपांवरही संयुक्तरीत्या ताबा मिळवणे भाजप- शिवसेनेला शक्य होणार आहे. 
विधानसभा निवडणुकीतही शिवसेना- भाजप स्वतंत्रपणे लढले, मात्र दोघांनाही बहुमताचा आकडा गाठता आला नाही. अखेर दोन्ही पक्षांना एकत्र येऊनच सत्ता मिळवावी लागली. शिवसेना भाजपला मानणाऱ्या मतदारांनी ‘युती’लाच कौल दिल्याचा निष्कर्ष त्या वेळी राजकीय तज्ज्ञांनी काढला होता, त्याचा काही अंशी प्रत्यय आताही येत आहे. मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांपासून एकत्र असलेल्या या दोन्ही मित्रपक्षांनी या वेळी स्वबळावर निवडणूक लढली. या दोघांच्या भांडणात आपला लाभ होईल, असा विरोधी पक्षांचा कयास होता. मात्र, मुंबईच्या मतदारांनी शिवसेना- भाजपलाच समसमान कौल देऊन युतीनेच कारभार चालविण्यास भाग पाडले. 
मुंबई मनपात 114 या बहुमताच्या जादुई आकड्यापासून शिवसेनेकडे (84 जागा) 30, तर भाजपकडे (82 जागा) 32 जागांची कमतरता आहे. 30 जागा मिळविणाऱ्या काँग्रेसची मदत घेण्यास दोघांचीही तयारी नाही. त्यामुळे मुंबई सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा युती करावी, असा आग्रह दोन्ही पक्षांतील नेत्यांचा आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यभर हाच पॅटर्न राबवावा, अशी अपेक्षा भाजप नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलूनही दाखवली. त्यामुळे भविष्यात त्यादृष्टीने दोन्ही पक्षांत चर्चेच्या फेऱ्या झडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास मुंबईसह आणखी तीन महापालिका आठ जिल्हा परिषदांमध्ये युतीची सत्ता येऊ शकेल.

त्रिशंकू अवस्थेतील या जि.प.वर युतीला मिळू शकेल सत्ता....
औरंगाबाद (भाजप 22 + शिवसेना 18)
जालना (22 + 14)
हिंगोली (10 + 15)
सांगली (23 + 3)
नाशिक (15 + 25)
जळगाव (33 + 14)
यवतमाळ (17 + 20)
बुलडाणा (24 + 9)

 
त्रिशंकू अवस्थेतील या मनपावर युतीला मिळू शकेल सत्ता...
मुंबई (भाजप 82 + शिवसेना 84)
उल्हासनगर (32 + 25)
सोलापूर (49 + 29)


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, मिनी मंत्रालयातील (जि.प) भाजप आणि शिवसेनेचे बलाबल... भाजपच्या नेत्यांकडून राज्यात शिवसेनेशी हातमिळवणीचे संकेत
बातम्या आणखी आहेत...