आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज राज्याचा अर्थसंकल्प, कर्जाच्या डोंगरावर राज्यात दुष्काळाचे ढग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याचा आर्थिक विकास दर ८ टक्के राहिल्याचे राज्य सरकारने २०१५-१६ च्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. मात्र त्याच वेळी राज्यावर ३,३३,१६० कोटी कर्ज आहे. दरडोई सुमारे ३० हजार रुपयांच्या कर्जाच्या डोंगरावर दुष्काळाचे ढग आहेत.

राज्यातील कृषी व संलग्न क्षेत्रातील उत्पादन घटले आहे. महागाई आटोक्यात आल्याचा दावा करतानाच ग्रामीण, शहरी भागातील खाद्यपदार्थ महागल्याची कबूली राज्य सरकारने दिली आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी वाढून १ लाख ३४ हजार ८१ रुपयांवर गेले आहे. २०१३-१४ वर्षात स्थूल उत्पन्न १४ लाख ४१ हजार ८४३ कोटी होते. हे उत्पन्न २०१४-१५ या वर्षात १५ लाख २४ हजार ८४६ कोटी झाल्याने गेल्या आर्थिक वर्षात राज्याने ५.८ टक्के विकास दर साध्य केला. २०१५-१६ या सरत्या आर्थिक वर्षात हा विकास दर ८ टक्क्यांवर पोहोचून १६ लाख ७५ हजार कोटींवर पोहोचणे अपेक्षित आहे. सेवा क्षेत्रात १०.९ टक्के तर उद्योग क्षेत्रात ५.९ टक्के अपेक्षित आहे. सलग दोन वर्ष कृषी उत्पादन घटले असताना सेवा व उद्योग क्षेत्राच्या कामगिरीच्या भरवशावर अर्थव्यवस्थेने ८ टक्के विकास दर गाठला, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
आर्थिक पाहणी
> ३,३३,१६० कोटींचे कर्ज,
> दरडोई २९,६४० रुपये कर्ज
> विकास दर ८%, दरडोई उत्पन्नात ७ टक्के वाढ
प्रतिबिंबच दिसत नाही
राज्याच्या आर्थिक विकास दर ८ टक्के झाल्याचे राज्य सरकार सांगत आहे. असे असले तरी कर संकलनात विकासदर वाढीचे प्रतिबिंब दिसत नाही. मुद्रांक शुल्क किंवा अबकारी करात तसेच मूल्यवर्धित करात अपेक्षित वाढ झालेली नाही, असे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
महसुली जमा, कर्जात वाढ
या आर्थिक वर्षात महसुली जमेत १८ हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे. दुसरीकडे कर्जाच्या व्याजातही वाढ होत आहे. गेल्या वर्षी सरकारला २४ हजार २८३ कोटी व्याजापोटी द्यावे लागले. यावर्षी २७ हजार ६६३ कोटी द्यावे लागतील. राज्यावर २०१५-१६ मध्ये ३ लाख ३३ हजार १६० कोटींचे कर्ज होणार आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कृषी क्षेत्राचा विकास दर घटला, उसाला फटका....
बातम्या आणखी आहेत...