आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra's Universities Collect 62 Lack For Jammu Kashmir Floods Affected People

महाराष्ट्रातील विद्यापीठांचा पूरग्रस्तांसाठी ६२ लाखांचा निधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठांच्या कुलगुरूंनी बुधवारी राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती विद्यासागर राव यांची भेट घेऊन जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठह ६१.७८ लाख रुपयांचा निधी पंतप्रधान सहायता कोशासाठी सोपवला. राज्यपालांनी विद्यापीठांच्या योगदानाचे स्वागत केले.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी ३० लाख रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी १५ लाख रुपये, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी १० लाख रुपये, तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी ६२.७८ लाख रुपयांचे धनादेश पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सहायता कोशासाठी राज्यपालांकडे सुपूर्द केले. त्यांनी तो निधी पंतप्रधान मदतनिधीसाठी पुढे पाठवून दिला. मुंबई विद्यापीठ (२५ लाख) व श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (१० लाख) यांनी यापूर्वीच जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी आपले योगदान दिले आहे.