आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत महाराष्‍ट्रायीन कुटुंबाचा अपघात, वृद्ध आई-वडिलांसह मुलगा ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत चंदन गवई आणि गंभीर जखमी असलेल्‍या त्‍यांच्‍या पत्‍नी मनीषा. - Divya Marathi
मृत चंदन गवई आणि गंभीर जखमी असलेल्‍या त्‍यांच्‍या पत्‍नी मनीषा.
न्‍यूयार्क / मुंबई - अमेरिकेतील आयटी कंपनीमध्‍ये कार्यरत असलेला एक महाराष्‍ट्रायीन युवक आणि त्‍याच्‍या आई-वडिलांचा अपघातात मृत्‍यू झाला तर त्‍याची पत्‍नी गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना सोमवारी रात्री लॉंग आयलँडमधील याफंक मिडिल आयलँड रोडवर घडली. चंदन गवई (32) त्‍यांच्‍या आई अर्चना गवई (60) आणि वडील कमलनयन गवई (74) अशी मृतांची आहेत. मनीषा (30) असे जखमी तरुणीचे आहे.
11 महिन्‍यांचा चिमुकला बचावला
या भीषण अपघातात गवई दाम्‍पत्‍याचा 11 महिन्‍यांचा मुलगा बचावला आहे. त्‍याला यात साधे खरचटलेसुद्धा नाही.
आई-वडिलांना घेतले होते बोलावून
> चंदन यांनी काही दिवसांपूर्वी पर्यटन व्‍ह‍िसावर आपल्‍या आई-वडिलांना बोलावून घेतले होते.
> आपल्‍या कारने ते त्‍यांना अमेरिकेतील प्रेक्षणीय स्‍थळांची सैर घडवून आणत होते.
> याच दरम्‍यान अपघात झाला.
असा झाला अपघात
> चंदन हे त्‍यांची कार योग्‍य बाजूने चालत होते.
> मात्र, विरुद्ध दिशेने येणारा ट्रक रॉंग साइडने आला आणि त्‍यांच्‍या कारवर आदळला.
> यात चंदन यांच्‍या कारचा चुराडा झाला.
> त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला तर त्‍यांच्‍या आईवडिलांचा अपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.
ट्रकचा चालक होता नशेत, त्‍याचाही झाला मृत्‍यू
या बाबत सफोल्क काऊंटी पोलिसांनी सांगितले, ज्‍या ट्रकने चंदन यांच्‍या कारला धडक दिली. त्‍याचा चालक गस्टवे गेयर (25) हा नशेत होता. या अपघातात त्‍याचाही घटस्‍थळावरच मृत्‍यू झाला.
पत्‍नी गंभीर जखमी
चंदन यांच्‍या पत्‍नी मनीषा गंभीर जखमी झाल्‍यात. त्‍यांच्‍यावर अमेरिकेतील एका खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. दरम्‍यान, त्‍यांच्‍या 11 महिन्‍यांच्‍या मुलीची देखभाल करण्‍यासाठी भारतातून त्‍यांच्‍या नातेवाईकांना बोलावून घेतले जाणार आहे, अशी माहितीसुद्धा अमेरिकन पोलिसांनी दिली.
गवई कुटुंब आहे मुंबईचे
> अपघातग्रस्‍त गवई कुटुंब हे मुंबईचे आहे. गंभीर जखमी असलेल्‍या मनीषा यांचे माहेर जळगाव जिल्‍ह्यातील भुसावळ येथील आहे.
> जानेवारी 2011 मध्‍ये चंदन आणि मनीषा यांचा विवाह झाला होता.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अपघाताचे आणि गवई कुटुंबीयांचे फोटोज... दुसऱ्या क्रमांकाच्या स्लाईडवर बघा भीषण अपघाताचा व्हिडिओ... अमेरिकेच्या सर्व प्रमुख वाहिन्यांनी कव्हर केली न्युज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...