आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरला लॉ युनिव्हर्सिटी, माहिती-जनसंपर्काची भरती लोकसेवा आयोगामार्फत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - औरंगाबाद आणि मुंबई पाठोपाठ नागपूर येथे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिका-यांची पदे लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज (बुधवार) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

औरंगाबाद, मुंबई येथे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी स्थापनेचा निर्णय झाल्यानंतर विदर्भातूनही नॅशनल लॉ युनिवर्सिटीची मागणी होती. कायद्याच्या क्षेत्रात नागपूर महत्त्वाचे ठिकाण आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर येथे खंडपीठ देखील आहे. या शहराने देशाला अनेक कायदेपंडित दिले आहेत. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागपूर येथे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. आधाच या निर्णयाला तत्वतः मान्यता देण्यात आली होती. या युनिव्हर्सिटीची विद्यार्थी संख्या 100 ते 120 असणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना येथे प्राधान्य देण्यात येणार असून परदेशातील आणि इतर राज्यातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या आधारे जास्तीत जास्त शुल्क आकारले जाणार आहे.

दुसरा महत्त्वाचा निर्णय माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील गट-अ आणि गट-ब वर्गातील पदे यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी ही पदे सरळसेवेने आणि पदोन्नतीने भरण्यात येत होती.