आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्‍यातील माजी आमदारांचे निवृत्ती वेतन आता दरमहा 40 हजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील काही भागात पुरस्थिती आणि मुंबई, नागपूर, औरंगाबादसह सर्वच शहरातील रस्त्यांची धुळधान झालेली असताना राज्यसरकारने राज्यातील माजी आमदारांच्या निवृत्तीवेतनामध्ये 40 हजारांची वाढ करून राज्याच्या तिजोरीवर 30 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा टाकला आहे. पावसाळी अधिवेशनात केवळ दोन मिनिटांमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

राज्यातील 822 आमदारांसह 750 मृत आमदारांच्या कुटुंबियांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. 40 हजार रुपये दर महा निवृत्तीवेतन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. माजी खासदारांना सध्या 20 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते. माजी खासदारांपेक्षेही आता माजी आमदारांचे निवृत्तीवेतन जास्त झाले आहे.