आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharshtra Govt. Facilitation Dr. Bhalchandra Nemade On First May

भालचंद्र नेमाडे यांचा गेट वे ऑफ इंडियावर सरकार करणार गाैरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल मे रोजी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा राज्य सरकारच्या वतीने मुंबईच्या गेट वे अॉफ इंडिया येथे भव्य दिव्य सत्कार केला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा गाैरव केला जाणार अाहे. अशा प्रकारे ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकाचा राज्य सरकारच्या वतीने प्रथमच सत्कार केला जात अाहे.

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांना मिळालेला ज्ञानपीठ हा साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे मराठी भाषेचा गौरव आहे, अशी भूमिका घेत राज्य सरकारने हा ज्ञानपीठ गौरव सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यादरम्यान भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला या पहिल्या कादंबरीचे अभिवाचन करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागातील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली आहे. याशिवाय वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज आणि विं.दा. करंदीकर या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचे स्मरणही या वेळी केले जाणार असून त्यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

मे रोजी होणाऱ्या या सोहळ्याची संपूर्ण तयारी सांस्कृतिक विभागाने पूर्ण केली असून मान्यवरांना निमंत्रण पत्रिकाही पाठवण्यात आली आहेत.